स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल, श्रीवर्धन, माणगाव, महाड, तालुक्यात महायुतीचा जोरदार प्रचार...
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल, श्रीवर्धन,माणगाव,महाड,तालुक्यात महायुतीचा जोरदार प्रचार..


पनवेल / प्रतिनिधी : -
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल मध्ये पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार यांच्यासोबत ८ जिल्हा परिषद मतदार संघ व १६ पंचायत समिती मतदार संघामध्ये पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक गावात  जाऊन महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. 

त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे आमदार व महाराष्ट्राचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री नामदार  भरतशेठ गोगावले यांच्या बरोबर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सुयोग लोखंडे,महाड तालुका अध्यक्ष सुजित जाधव व माणगाव तालुका अध्यक्ष नितेश हाटे हे त्या तीनही तालुक्यातील जिल्हा परिषद उमेदवार व पंचायत समिती उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे निश्चितपणे महायुती विजयी होणार असल्याचे बोलले जात आहे. श्रीवर्धन, महाड, माणगाव तालुक्यामध्ये पक्षाच्या वतीने शिंदे गटाच्या उमेदवारांचा व महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करीत आहेत.
Comments