स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचा माणगाव, महाड आणि श्रीवर्धन मधील शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर
पनवेल वैभव / दि. ०२ (संजय कदम) :
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सुयोग लोखंडे, महाड तालुका अध्यक्ष सुजित जाधव, व माणगाव तालुका अध्यक्ष नितेश हाटे यांनी रायगड जिल्हा संघटक राजेश हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटाचे महाडचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत शेठ गोगावले यांची भेट घेऊन पक्षाच्या वतीने या तिन्ही तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेचे उमेदवार व पंचायत समितीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे.
पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बैठका या तिन्ही तालुक्याच्या अध्यक्षांनी घेतलेल्या आहेत व सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की महायुतीचे जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून यावे यासाठी गावोगावी प्रचार करणार आहेत व त्या दृष्टीने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गाव बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे.
फोटो : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाने शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा केला जाहीर