वैश्य वाणी जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न...
वैश्य वाणी जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न


नवीन पनवेल : वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट व रायगड जिल्हा वैश्य समाज युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मनोज महादेव आंग्रे पुरस्कृत जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार 26 जुलै 2026 रोजी जेष्ठ नागरिक संघ हॉल पनवेल येथे संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रांत पाटील होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि वैश्यवाणी समाजासाठी वैश्य भवन सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आजची Gen Z ही केवळ तंत्रज्ञानाशी जोडलेली पिढी नसून, ज्ञान, कौशल्य, नवकल्पना आणि आत्मविश्वासाच्या बळावर देशाचे भविष्य घडविणारी ताकद आहे, यावर विशेष भर दिला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला योग्य प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ही युवा शक्ती समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीत मोठे योगदान देऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला.
          यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात दिशा दाखवणारे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम विद्यार्थी केंद्रित असल्याने विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी देण्यात आली. 103 विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्याला शिक्षण क्षेत्रात समाजाचे योगदान कसे मिळते आणि आपण पुढे काय केले पाहिजे. याविषयी आपल्या विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज महादेव आंग्रे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी वैश्य ग्लोबलचे विश्वस्त विष्णू सातवसे, खाडे, मेजारी, नितीन पानसरे, दीपक खेडेकर, रायगड जिल्हा वैश्य समाज युवक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र फक्के, रायगड जिल्हा महिला वैश्य समाज मंडळाच्या उपाध्यक्ष हर्षला तांबोळी, योगेश तांबोळी, उमेश मनोरे, प्रकाश मनोरे, प्रकाश चौधरी, दिलीप आंग्रे, लाड, स्वराली साईकर, पूजा साखरे, सुनील शेटे, प्रदीप दलाल, सर्वेश दलाल, प्रवीण जगे, विजय आंग्रे, महेश आंग्रे आशिष आंग्रे, महेश आंग्रे, सुनील चंबावडे व जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कै. मालती मधुसूदन पोटे (कोप्रोली, उरण) स्मृतीप्रित्यर्थ उखाणा स्पर्धांचा बक्षीस समारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पोटे, संतोष चौधरी व राजेंद्र चौधरी यांनी केले.
Comments