पनवेल मध्ये कारगिल विजय दिनानिमित्त शूरवीरांना अभिवादन...
पनवेल मध्ये कारगिल विजय दिनानिमित्त शूरवीरांना अभिवादन

वेटरन्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने (VWA) पनवेलमध्ये ७ किमी सायक्लोथॉनचे आयोजन


पनवेल /प्रतिनिधी  : -
कारगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी वेटरन्स वेल्फेअर असोसिएशनने (VWA) पनवेलमध्ये ७ किमी सायक्लोथॉनचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. डॉ. जयश्री पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली तर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीमती वापी प्रज्ञा मुंडे यांनी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सायकल चालवण्यास सुरुवात केली.
        
या कार्यक्रमाला भव्य यश मिळवून देण्यासाठी स्वयंसेवक, समर्थक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वेटरन्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने, अध्यक्ष महेंद्र सिंह (मार्कोस), पुरुषोत्तम लाल, भूषण पाटील, देवेंद्र शुआ, प्रताप नायक, गौतम सिंह आणि आशुतोष यांच्यासह धनंजय कदम प्राचार्य, भवन कॉलेज रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थ एंड डॉ.जयश्री पाटील, अध्यक्षा, इंडस्ट्रियल रोटरी क्लब ऑफ पनवेल, पुरण सिंग आणि पनवेल सायकलिंग ग्रुप ऋग्वेद कांडपिळे आणि त्यांची टीम सहभागी झाले होते.
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आणि कारगिल युद्धातील शूरवीरांचा वारसा जपण्यासाठी वेटरन्स वेल्फेअर असोसिएशन वचन बद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Comments