नगरसेविका आर्या प्रविण जाधव यांची नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक व विरंगुळा केंद्रासाठी महापालिकेकडे मागणी...
नगरसेविका आर्या प्रविण जाधव यांची नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक व विरंगुळा केंद्रासाठी महापालिकेकडे मागणी...

पनवेल / प्रतिनिधी : -
महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रविण जाधव यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत नागरिकांच्या मागणीनुसार जॉगिंग ट्रॅक व विरंगुळा केंद्र बनविण्यात यावे यासाठी मागणी केली.

पनवेल महापालिका प्रभाग क्रं १४ खांदा कॉलनी, सेक्टर १३ येथे हॉरिझन हायस्कुल शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानाच्या फुटपाथवर जॉगिंग ट्रॅक तसेच मोकळ्या मैदानाच्या एका बाजूला फुटपाथवर विरंगुळा केंद्र बनविण्यात यावे यासाठी स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार नगरसेविका आर्या जाधव यांनी महासभेत तसेच महापालिकेला दिलेल्या पत्रानुसार सदर काम लवकरात लवकर करून देण्याची मागणी केली आहे.
Comments