पनवेल / प्रतिनिधी : -
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी गव्हाण, वडघर, पळस्पे आणि सुकापुर जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू केलेला आहे.
त्याचप्रमाणे दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी पनवेल तालुक्यातील सर्व आठही जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संध्याकाळी ५ वाजता त्यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेली आहे.
सदर बैठकीमध्ये ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर २० मार्च २०२६ रोजी महाड येथे होणाऱ्या क्रांती दिनाच्या निमित्त आयोजित सभेच्या पूर्वतयारी विषयी सुद्धा चर्चा करण्यात येणार आहे.
जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी त्यांच्याशी संपर्कात असलेल्या सर्व सामाजिक संघटना व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेणे सुरू केलेले आहे व महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याविषयी ते आवाहन करत आहेत.