हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना १०० व्या जन्मदिनानिमित पनवेल शिवसेना शहर शाखेतर्फे विनम्र अभिवादन
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२६ रोजी पनवेल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर शाखेतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले, हे वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे पनवेल शहरात शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, यावेळी साहेबांच्या तमाम शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या आठवणी जागवल्या.
यावेळी शहर प्रमुख प्रविण जाधव, महिला संघटिका उज्वला गावडे, विभाग संघटिका अश्विनी देसाई, प्रशांत नरसाळे, जुनैद पवार, निखिल भगत, भास्कर पाटील, कुणाल कुरघोडे, प्रदीप माखीजा, मयुरेश पाटील, आदिल आवसेकर, राजेश शेट्टीगार, बापू जोशी, नूर वाईकर, सचिन कदम आदी उपस्थित होते.