नगरसेविका कु.आर्या प्रविण जाधव यांची समाजोपयोगी कार्यास सुरवात..
पनवेल वैभव / प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे निवडून आलेल्या सर्वात तरुण (२१वर्ष १०महिने) सुशिक्षित नगरसेविका म्हणून ज्यांना मान मिळाला त्या कु.आर्या प्रविण जाधव या पनवेल शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या कन्या आहेत. शिवसेनेच्या ८०% समाजकारण २०% राजकारण या उक्ती नुसार त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली आहे.
महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या जाधव या प्रभाग क्रं १४ मधून निवडून आल्या आहेत. तरी देखील त्या रहात असेलेल्या प्रभाग क्रं १८ मधील श्री गणपती मंदिराजवळील रस्त्याचे काम त्यांनी तातडीने करून घेतले आहे, जेणेकरून २२ जानेवारी रोजी श्री गणेश जयंती निमित्ताने श्री गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होता काम नये.
त्यांच्या या कामाच्या धडाडीने त्यांनी जनतेची मने जिंकली आहेत, या पुढे ही मी अशीच पनवेलकर जनतेची सेवा करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. त्यांच्या या सामाजिक कामाबद्दल नागरिकांनी आभार मानून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्याबद्दल सर्व स्तरावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.