गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
पनवेल तालुक्यातील ठोंबरेवाडी येथे गोदरेज सिटी

एक लाख कुटुंबांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, श्रध्दा आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीचा सोहळा ; पिरोजशा गोदरेज


पनवेल (प्रतिनिधी) विश्वास, कृतज्ञता आणि प्रगतीच्या एका सुवर्णक्षराचे साक्षीदार होत, गोदरेज प्रॉपर्टीजने एक लाख घरांच्या विक्रीचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या यशाचे अनोखे सेलिब्रेशन म्हणून कंपनीने नवी मुंबईतील नेरुळ येथील रहिवासी असलेल्या नैना कुटुंबाला एक घर विनामूल्य भेट दिले आहे. ग्राहकांनी गेल्या अनेक वर्षांपासून गोदरेज समूहावर दाखवलेला अढळ विश्वास आणि त्यांच्यासोबत असलेल्या घट्ट नात्याचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. पनवेल तालुक्यातील ठोंबरेवाडी येथे  गोदरेज सिटीमध्ये साकारलेले हे घर गोदरेज प्रॉपर्टीजच्या मूळ विचारधारेचे प्रतीक आहे. 

प्रत्येक घर हे प्रगती, आकांक्षापूर्ती आणि आपलेपणाची अनोखी कहाणी असते अशी कंपनीची धारणा आहे. या खास प्रसंगाचे औचित्य साधून कंपनीने लाखों मे एक ही विशेष मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम गोदरेजवर विश्वास ठेवून घराची निवड करणा-या १ लाख कुटुंबांना समर्पित आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून कंपनीने एका ग्राहकाला हक्काचे घर भेट दिले आहे. अत्यंत पारदर्शक आणि चोख प्रक्रियेतून या लाभार्थ्याची निवड करण्यात आल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. ही कोणतीही स्पर्धा किंवा ल़ॉटरी नसून, कंपनीच्या या सशस्वी प्रवासात सोबत असलेल्या ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उचलले पाऊल आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले,‘ हा क्षण म्हणजे एक लाख कुटुंबांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, श्रध्दा आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीचा मोठा सोहळा आहे. आम्ही सुपूर्द केलेली प्रत्येक घराची किल्ली ही आशेची एक नवी गोष्ट सांगते. आम्ही उभारलेली प्रत्येक वसाहत ही भारताच्या बदलत्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. एक लाख ग्राहकांचा हा टप्पा गाठल्यामुळे आम्हांस अभिमान आणि कृतज्ञता अनुभवता येत आहे. याचसोबत आता अगोदरपेक्षाही जास्त आत्मीयतेने आणि पूर्ण निष्ठेने काम करण्याची आमची जबाबदारी अधिक वाढली आहे, याची जाणीव होत आहे.’’

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे म्हणाले, ‘लाखों में एक हा उपक्रम आमच्यावर विश्वास ठेवणा-या प्रत्येक घरमालकाचा सन्मान करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. घर खरेदीच्या प्रत्येक निर्णयामागे प्रबळ इच्छाशक्ती, भावना आणि अपार कष्ट दडलेले असतात. गोदरेज प्रॉपर्टीला मानाचे स्थान मिळवण्यात योगदान देणा-या सर्व ग्राहकांचे मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. भविष्याचा वेध घेताना समृद्ध जीवनशैली, नाती बहरणा-या वास्तूंची निर्मिती करणे जेणेकरुन लोकांच्या दैनंदि आयुष्यात आनंद निर्माण होईल, हेच आमचे ध्येय आहे.’’
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image