एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन

मंडळाचे ५५ वर्ष पूर्ण होऊन ५६ व्या वर्षात पदार्पण.. 


पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
सालाबादप्रमाणे एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे सार्वजनिक होलिकोत्सव( होळी) व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रम श्री हनुमान मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, लाईन आळी, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे.

एकता मित्र मंडळ, लाईन आळी यंदा ५५ वर्ष पूर्ण करून ५६ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, या निमित्ताने होळी उत्सव, सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसाद आयोजन त्याचप्रमाणे दैनंदिन कार्यक्रम 
रविवार दि १ मार्च रोजी क्रिकेट सामने, 
सोमवार २ मार्च रोजी होळी पूजन व लहान मुलांचे खेळ, मंगळवार ३ मार्च रोजी मुला - मुलींचे खेळ, 
बुधवार ४ मार्च रोजी खेळ, खुला गट व महिला, 
गुरुवार ५ मार्च रोजी तुकाराम बीज निमित्त सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद 
शुक्रवार ६ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होणार आहे. सदर मंडळाचे स्फुर्तीस्थान स्व.लक्ष्मणशेठ दशरथशेठ कुरघोडे हे आहेत.

एकता मित्र मंडळ लाईन आळी पनवेलच्यावतीने अध्यक्ष गौरव सावंत, उपाध्यक्ष कपिल कुरघोडे, सचिव अभिजित साखरे, खजिनदार मितेश भोपी, सदस्य अश्विन सातारकर, सनील बेंडखळे, विवेक पवार, सुमित दसवते, साहिल मोरे, मयुरेश कुरघोडे, कैलास गायकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना होलिकोत्सव, महापूजा व महाप्रसाद यासाठी उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image