नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान ; हाँगकाँग एअरकार्गोची सेवा सुरू ...
नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान ; हाँगकाँग एअरकार्गोची सेवा सुरू 
१३ आंतरराष्ट्रीय मालवाहूसेवांचा विस्तार होणार
 

पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीयविमानतळाने (NMIA) जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पागाठला. हाँगकाँग येथून हाँगकाँग एअर कार्गोचे पहिले समर्पित आंतरराष्ट्रीय मालवाहूविमान नवी मुंबई  आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.विमानतळावरील आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवांच्या विस्ताराचा हा महत्त्वाचा टप्पा असून,आगामी काळात आणखी १३ नवीन आंतरराष्ट्रीय मालवाहू सेवा सुरू होणार आहेत. 
हाँगकाँग एअर कार्गोतर्फे हाँगकाँग आणि नवी मुंबई दरम्यान आठवड्यातून तीनसेवा चालविण्यात येणार आहेत. यामुळे दर आठवड्याला सहा मालवाहतूक हवाई फेऱ्या होतील.या सेवेसाठी एअरबस A330-200F या मालवाहूविमानाचा वापर केला जाणारअसून, त्यातून आयात-निर्यात मिळून सुमारे ६० टन मालाची वाहतूक केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रातील विस्ताराला वेग देताना नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अल्पावधीत दोन महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. 
१५ जुलै२०२६ रोजी एअर इंडिया एक्सप्रेसची अबुधाबीला जाणारी पहिली आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू झाली. त्यानंतर १ ऑगस्ट २०२६ रोजी इंडिगो कार्गोची शारजाहला जाणारी पहिली समर्पित मालवाहू सेवा सुरूकरण्यात आली. या सेवेद्वारे २० टन मालाची वाहतूक करण्यातआली. या घडामोडींमुळे प्रवासी तसेच मालवाहतूक क्षेत्रात नवी मुंबईआंतरराष्ट्रीय विमानतळाची वेगवान प्रगती अधोरेखित झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवांचाविस्तार वेगाने होतअसून, आशिया, युरोप आणि पश्चिम आशियातील प्रमुख शहरांसाठी विविध आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्यासाठी अर्ज दाखल केले असून त्यांना मंजुरीही मिळाली आहे. 
यामध्ये हाँगकाँग, चेंगडू, बँकॉक, तैपेई,क्वालालंपूर, सिंगापूर, अबुधाबी, दोहा, फ्रँकफर्ट, इस्तंबूल, दुबई, अॅमस्टरडॅम,बहरीन, पॅरिस आणि रियाध या प्रमुख शहरांचा समावेश आहे. “ऑगस्टच्या अखेरीस मालवाहू विमानांच्या सेवांमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. आशिया, युरोपआणि पश्चिम आशियातील महत्त्वाच्या बाजारपेठांशी जोडणी मजबूतकरण्यासाठी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक नेटवर्कचा वेगाने विस्तार करण्यात येणार आहे. यावाढत्या नेटवर्कमुळे निर्यातदार, आयातदार आणि उद्योगांना अधिक संधी उपलब्ध होतील. 
तसेच महाराष्ट्र आणि पश्चिम भारतासाठी धोरणात्मक लॉजिस्टिक्स व व्यापार प्रवेशद्वारम्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची भूमिका अधिक भक्कम होणार आहे. राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण तसेच महाराष्ट्र शासनाच्या लॉजिस्टिक्स धोरण२०२४ शी सुसंगत पद्धतीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तंत्रज्ञानाधारित आणि अखंडित मालवाहतूक व्यवस्था उभारली जात आहे. या विस्तारितनेटवर्कमुळे विमानतळाची जगातील प्रमुख व्यापार व लॉजिस्टिक्स केंद्रांशी जोडणी होणार असून, पश्चिम भारतासाठी महत्त्वाचे मालवाहतूक केंद्रम्हणून विमानतळाचे स्थान अधिक मजबूत होणार आहे. 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची टप्प्याटप्प्याने विकसितकेली जाणारी आणि विस्तारक्षम मालवाहतूक पायाभूत सुविधा देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय,एक्स्प्रेस तसेच विशेष प्रकारच्या मालवाहतुकीसाठी सज्ज आहे. यामध्ये औषधे,नाशवंतवस्तू, मौल्यवानवस्तू, अवजड माल आणि धोकादायक वस्तूंच्या वाहतुकीचा समावेश आहे. भविष्यात माल हाताळणी प्रक्रियेत स्वयंचलित तंत्रज्ञान आणि डिजिटल मालवाहतूक प्रणालींचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे.
Comments