पनवेल येथील के.ई.एस. इंदुबाई वाजेकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक-पालक संघाची स्थापना
मानसी कोकीळ आणि मनीषा पाटील यांची अध्यक्षपदी निवड
पनवेल/प्रतिनिधी :-- कोकण एज्यूकेशन सोसायटीच्या येथील इंदुबाई वाजेकर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मंगळवारी (११ ऑगस्ट) 'शिक्षक पालक संघ' (PTA) स्थापना बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत वर्ष २०२६ साठीच्या नूतन कार्यकारिणीची जाहीर निवड करण्यात आली.
शाळेच्या अध्यक्षपदाची धुरा मुख्याध्यापिका मानसी कोकीळ आणि मनीषा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी अर्चना कदम, केतकी मुकादम, जयश्री पाटील आणि सोनम पवार यांची निवड झाली. सचिव म्हणून फ्रेडा डिटे, मिनिज काजी, दर्शना शिंदे, मीनाक्षी भोईर तर उपसचिव म्हणून पूजा येरुणकर, रुणाली म्हात्रे, नेहा राणे आणि जयेंद्र शेटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या प्रसंगी शाळेतील इतर शिक्षिका आणि बहुसंख्येने पालक उपस्थित होते.३७०० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ११२ सीसीटीव्ही बैठकीत मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका मानसी कोकीळ यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शाळेत सध्या नर्सरी ते इयत्ता १२ वी पर्यंतचे तब्बल ३,७०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या मार्गदर्शनासाठी ९७ शिक्षक व शिक्षिकेचा स्टाफ कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी शाळेत ४५ वर्गखोल्या आणि सुसज्ज सायन्स लॅब उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते, परंतु यासाठी पालकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांनी केले.
तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, संपूर्ण शाळा परिसरात ११२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे विद्यार्थ्यांवर चोख नियंत्रण ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीचे शाळेच्या प्रशासनाकडून शिक्षिका आणि उपस्थित पालकांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.