करंजाडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आनंद द्विगुणित..
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम
पनवेल/प्रतिनिधी -- आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडे जिल्हा परिषद शाळेत वह्यांचे वाटपपनवेल:पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करंजाडे येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करंजाडे येथील माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम आज, बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवशी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छा दिल्या. याच पार्श्वभूमीवर करंजाडे येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांचा शैक्षणिक आनंद द्विगुणित करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी करंजाडे गावचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, सदस्य अतिष साबळे, माजी सदस्य नाथा भरवाड, भाजप करंजाडे शहर महिला अध्यक्षा सुषमा मयेकर, शर्वरी पोईपकर, तसेच उमेश भोईर, केतन आंग्रे, ओमकार चौधरी, मुख्याध्यापक दिगंबर जाधव साहेब आणि शिक्षक वर्ग यांसह इतर मान्यवर, ग्रामस्थ आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.