पनवेल विभाग प्रमुखपदी प्रवीण पोपटराव जाधव यांची नियुक्ती...
पनवेल महानगर मधील प्रभाग क्रं १४,१८,१९,२०, या प्रभागांची जबाबदारी ...
पनवेल / प्रतिनिधी :-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवनेते आदित्य ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या मार्गदर्शनाने, उपनेते बबनदादा पाटील यांच्या सल्ल्याने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पनवेल विभाग प्रमुखपदी प्रवीण पोपटराव जाधव यांची पुनःश्च नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रायगड जिल्हासंघटनेच्यावतीने पनवेल विभाग प्रमुखपदी प्रवीण जाधव यांची पनवेल प्रभाग क्रं १४,१८,१९,२०, या प्रभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पनवेल शहर प्रमुखपदी असताना जाधव यांनी नागरिकांच्या अनेक सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक समस्या दूर केल्या आहेत. त्याच्या या कामाची पोचपावती म्हणून पुन्हा पक्षाने पनवेलची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या कन्या कु.आर्या प्रवीण जाधव या प्रभाग क्रं १४ च्या नगरसेविका आहेत.
शिवसेना पक्षाच्यावतीने त्यांना माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, उपनेते बबनदादा पाटील, प्रसाद दादा भोईर, जिल्हा प्रमुख दीपक निकम, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र देण्यात आले.
या प्रसंगी पनवेल विभागप्रमुखपदी नियुक्ती केल्याबद्दल जाधव यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत.