स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन...
स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित  विविध कार्यक्रमांचे आयोजन
पनवेल / प्रतिनिधी : - स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष- युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शनिवार दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वृक्षारोपण, दुपारी २ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रा.जि. प. शाळा वडघर , दुपारी ४ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुरू लिंगेश्वर शाळा पनवेल, संध्याकाळी ५ वाजता साड्या वाटप कार्यक्रम पनवेल गेस्ट हाऊस येथे सायंकाळी ७ वाजता वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा रमाबाई नगर, प्रबुब्ध बुद्ध विहार वडघर येथे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन शरद कांबळे अध्यक्ष रमाबाई नगर वडघर, निलेश कांबळे अध्यक्ष पनवेल महानगर विधानसभा, प्रशांत सोनवणे अध्यक्ष पनवेल शहर, अरुण जाधव, विजय धोत्रे, सुजित जाधव, राजेश हाटे, जावेद मास्टर, मनोज कांबळे, समाधान कांबळे, चंद्रकांत वेळास्कर, दिलीप नाईक, नरेश परदेशी, भारत दाताड, मयूर गायकवाड, आसिफ शेख, सयोग लोखंडे, अमित कांबळे यांनी केले असून नागरिकांना वाढदिवसानिमित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments