पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६४ कंपन्यांचा सहभाग, २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ...
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
 ६४ कंपन्यांचा सहभाग...
२५०२ उमेदवारांनी घेतला लाभ..


पनवेल (प्रतिनिधी) रोजगाराच्या शोधातअसलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेभारतीय जनता पार्टी, पनवेलच्यावतीने आयोजितकरण्यात आलेल्या‘महारोजगार मेळावा२०२६’ला हजारो उमेदवारांचाउत्स्फूर्त प्रतिसादमिळाला. आज (दि. ८) चांगू काना ठाकूर महाविद्यालय,खांदा कॉलनीयेथे झालेल्याया मेळाव्याततब्बल ६४ नामांकित कंपन्यांनीसहभाग घेतल्यानेरोजगाराच्या विविधक्षेत्रांतील संधी उमेदवारांसाठी उपलब्धझाल्या.        भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महारोजगार मेळाव्यात दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच विविधकौशल्ये असलेल्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.सकाळपासूनच मेळाव्याच्या ठिकाणी युवक-युवतींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदारप्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याचे उदघाटन पनवेलचे महापौर नितीन पाटीलयांच्या हस्ते झाले.या मेळाव्यास ज्येष्ठ नेते वमाजी नगराध्यक्ष जे. एम.म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगडजिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक व नगरसेवक परेश ठाकूर, उपमहापौर प्रमिला पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू,प्रल्हाद केणी, नगरसेवक दशरथ म्हात्रे, डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, रवींद्र भगत, समीर ठाकूर, राजू सोनी, एकनाथगायकवाड, मधु पाटील,प्रवीण पाटील, अमरपाटील, विकास घरत,नगरसेविका प्रतिभा भोईर, सीतापाटील, जिल्हा परिषद सदस्या कमला देशेकर, पंचायत समिती सदस्यराजेंद्र पाटील, काशिनाथ पार्टे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत,स्वप्निल ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.पाटील, माजीनगरसेवक प्रभाकर बहिरा, ऍड.चेतन जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे,कामगार नेते जितेंद्र घरत, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाईक, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, भाजपचे शहर चिटणीस रुपेश नागवेकर, ओबीसी सेलचेराजेश गायकर, रामनाथ पाटील, डॉ.संतोष आगलावे, युवा मोर्चाचे नविन पनवेल अध्यक्ष मयूर कदम, पनवेलशहर अध्यक्ष हिमेश बहिरा,चिन्मय समेळ, अक्षयसिंग, विश्वजीत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या करिअरला योग्य दिशा देणे, या उद्देशाने भविष्यातही अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले.  ६४ कंपन्यांच्यासहभागामुळे विविधउद्योग आणि रोजगार क्षेत्रांतीलसंधी एकाच छताखाली उपलब्धझाल्या. यामध्ये २५०२ उमेदवारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कंपन्यांच्या प्रतिनिधींनीउमेदवारांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिकपात्रता, कौशल्यआणि अनुभवाच्याआधारे विविधपदांसाठी मुलाखतीघेतल्या. त्यामुळेअनेक उमेदवारांनारोजगाराच्या संधींसोबतचकरिअरविषयक मार्गदर्शनआणि उद्योगक्षेत्रातील आवश्यककौशल्यांची माहितीमिळाली. यामेळाव्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स, असाहीइंडिया ग्लासलिमिटेड,  युनिकेअर हेल्थकेअर,  इकोशाईन फॅसिलिटीसोल्युशन्स एलएलपी,आयपीएस ग्रुप्स, पटेल ज्वेलर्सप्रायव्हेट लिमिटेड,सदरलँड, लिशियस, फॉर्च्यून सिम्बॉलॉजी रिसर्चसेंटर, युवाशक्ती स्किल इंडिया प्रायव्हेटलिमिटेड, क्युअरफूड्स, एनआयआयटीफाउंडेशन, सिमरनमोटर्स, ॲक्सिस बँक, वाशी इंटिग्रेटेडसोल्युशन्स, टाटा स्ट्राइव्ह, झेप्टो, ब्लूमबे एंटरप्रायझेस, डिजिटाइड सोल्युशन्स, १पॉइंट१, प्रशांत कॉर्नर प्रायव्हेट लिमिटेड,सोडेक्सो इंडियासर्व्हिसेस प्रायव्हेटलिमिटेड, आरपॉवर, इंजेनिक्स, यूएम सर्व्हिसेस, एचडीबीफायनान्शियल सर्व्हिसेस, एसबीआय कॅप सिक्युरिटीज, महिंद्राइंटिग्रेटेड बिझनेससोल्युशन्स, मुथूटफायनान्स लिमिटेड, एस. एच. केलकर, नेटटेक इंडिया, क्वेस कॉर्पलिमिटेड, टॅलीउन्नती इन्फो सर्व्हिसेस प्रायव्हेटलिमिटेड, शेट्टी इन्फ्रासर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, अरकॅश इंडियाएलएलपी, ऑटोबानट्रकिंग कॉर्पोरेशनप्रायव्हेट लिमिटेड, एसके ग्रुप, डीआरएस अर्थवर्कप्रायव्हेट लिमिटेड, पॅराडाइमआयटी टेक्नॉलॉजीजसर्व्हिसेस प्रायव्हेटलिमिटेड, झेनिथ्रा ग्लोबल सोल्युशन्स प्रायव्हेटलिमिटेड, द अक्षय पात्रफाउंडेशन, कोटकबँक लिमिटेड,मेरिट्यूड स्किलडेव्हलपमेंट प्रायव्हेटलिमिटेड, केमस्पेक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड,आईसबर्ग इंजिनिअरिंगप्रायव्हेट लिमिटेड,व्ही-इन्शुअरफार्मा प्रायव्हेटलिमिटेड, श्रीटेक्नोक्रॅट कम्युनिकेशनसिस्टिम्स प्रायव्हेटलिमिटेड (एसटीसीएस), अभिनव इन्स्टिट्यूटऑफ टेक्नॉलॉजीअँड मॅनेजमेंट, वॉट्स व्हेंचर्सप्रायव्हेट लिमिटेड, अमुवा कॉर्पोरेशन,रेडविंग मॅनेजमेंटफॅसिलिटेटर्स प्रायव्हेटलिमिटेड, गार्गीहटेन्स अल्बर्टसप्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबवर्क इन्फोटेक, टाइम्सप्रो (टाइम्सऑफ इंडियाग्रुप), एनआयआयटीलिमिटेड – आयएफबीआय, आयडीबीआय इन्फोटेकलिमिटेड, बीटीडब्ल्यू फायनान्शियलसर्व्हिसेस अँड आयएमएफ प्रायव्हेटलिमिटेड, प्रोव्हॅल्यूबिझनेस सोल्युशन्सप्रायव्हेट लिमिटेड, आयप्रोसेस सर्व्हिसेसइंडिया लिमिटेड, पीपल लॅब ॲडव्हायजरी, स्मार्टटेक बिझनेस मॅनेजमेंट, मायवेटेक्नॉलॉजीज, कोडरटेक्नॉलॉजीज आदी कंपन्यांचा सहभागहोता.             या मेळाव्याचे अत्यंतनियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध आयोजनकरण्यात आले होते. उमेदवारांचीनोंदणी, कंपन्यांचीमाहिती, मुलाखतीसाठीस्वतंत्र व्यवस्था,मार्गदर्शन कक्ष तसेच उमेदवारांनाआवश्यक सुविधाउपलब्ध करून देण्यात आल्याहोत्या. हजारोउमेदवारांची उपस्थितीअसूनही संपूर्णप्रक्रिया सुरळीतपणेपार पडली. आयोजक, स्वयंसेवकआणि संबंधितकार्यकर्त्यांच्या समन्वयामुळेमेळाव्याचे उत्तमनियोजन पाहायलामिळाले. आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांनाकेवळ शिक्षणचनव्हे तर त्यांच्या कौशल्यालायोग्य रोजगाराचीसंधी मिळणेअत्यंत गरजेचेआहे. ही गरज लक्षातघेऊन आयोजितकरण्यात आलेल्याया मेळाव्यामुळेपनवेल आणि परिसरातील युवकांनारोजगार, करिअरआणि उद्योगक्षेत्राशी थेट जोडले जाण्याचेमहत्त्वपूर्ण व्यासपीठउपलब्ध झाले. यावेळी सहभागीझालेल्या उमेदवारांनीमेळाव्याच्या आयोजनाचेआणि उपलब्धकरून देण्यातआलेल्या रोजगाराच्याविविध संधींचेकौतुक केले. ६४ कंपन्यांचासहभाग आणि हजारो उमेदवारांचीउपस्थिती यामुळे‘महारोजगार मेळावा२०२६’ हा पनवेलमधील रोजगाराच्यादृष्टीने महत्त्वपूर्णआणि यशस्वीउपक्रम ठरला.
Comments