नवीन ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन (TMS) लॅबमुळे मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांसोबतच स्ट्रोकनंतरचे पुनर्वसन, बोलणे व भाषा सुधारण्यास मदत तसेच नसांशी संबंधित वेदनांसाठी अत्याधुनिक, शस्त्रक्रियाविरहित उपचाराची सुविधा आता उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबई /पनवेल वैभव :
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नैराश्य, ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर ( OCD), मायग्रेन यांसारख्या मानसिक आणि न्यूरोलॉजिकल समस्या वाढताना दिसत आहेत. त्याचबरोबर स्ट्रोकनंतर हालचाल, बोलणे आणि दैनंदिन कामे पूर्ववत करण्यासाठीही अनेक रुग्णांना दीर्घकाळ पुनर्वसनाची गरज भासते. अशा रुग्णांना उपचाराचा आणखी एक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे अत्याधुनिक ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन (TMS) लॅब सुरू केली आहे.
या लॅबमध्ये उपचारांना प्रतिसाद न देणारे नैराश्य, ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर (OCD), पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD), मायग्रेन आणि धूम्रपान सोडण्यास मदत यांसारख्या निवडक मानसिक आरोग्यविषयक समस्यांसाठी TMS उपचार उपलब्ध असतील. तसेच स्ट्रोकनंतरचे पुनर्वसन, बोलण्याची क्षमता सुधारण्यासाठी आणि संवादातील अडचणी कमी करण्यासाठी , नसांशी संबंधित वेदना, फायब्रोमायल्जिया, पार्किन्सन्स, सेरेबेलर अटॅक्सिया, अल्झायमर आणि टिनिटस यांसारख्या काही न्यूरोलॉजिकल समस्यांमध्येही, निवडक रुग्णांसाठी TMS चा वापर केला जाऊ शकतो. रुग्णांना त्यांच्या उपचाराच्या प्रवासात आणखी एक आशेचा आणि प्रगत उपचाराचा पर्याय मिळावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
TMS उपचारामध्ये चुंबकीय स्पंदनांच्या मदतीने मेंदूच्या विशिष्ट भागांना उत्तेजित केले जाते. ही उपचारपद्धती शस्त्रक्रियाविरहित असून यासाठी भूल देण्याची गरज नसते. रुग्णाच्या आजारानुसार आणि गरजेनुसार मेंदूतील मूड, विचार करण्याची क्षमता, हालचाल आणि वेदनांशी संबंधित भागांवर TMS चा उपयोग केला जाऊ शकतो. उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णाची सविस्तर तपासणी केली जाते आणि त्याच्या आजाराची स्थिती व उपचाराचे उद्दिष्ट लक्षात घेऊन योग्य TMS उपचार पद्धती निवडली जाते.
या नव्या सुविधेमुळे नैराश्य, उपचारांना प्रतिसाद न देणारे नैराश्य, OCD, चिंता, PTSD, धूम्रपान सोडण्यास मदत आणि मायग्रेन यांसारख्या समस्यांनी त्रस्त रुग्णांना TMS उपचाराचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यासोबतच, स्ट्रोकनंतर पुन्हा हालचाल आणि दैनंदिन कार्यक्षमता सुधारण्यासाठी, तसेच बोलण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठीही निवडक रुग्णांना TMS उपचाराची मदत मिळू शकते. तसेच नसांशी संबंधित वेदना, फायब्रोमायल्जिया, पार्किन्सन्स, सेरेबेलर अटॅक्सिया, अल्झायमर आणि टिनिटस यांसारख्या काही न्यूरोलॉजिकल समस्यांमध्येही रुग्णाची तपासणी आणि उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे TMS उपचाराचा विचार केला जाऊ शकतो. उपचाराचा उद्देश प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार योग्य उपचार निवडून त्याच्या दैनंदिन जीवनात सुधारणा घडवून आणण्याचा आहे.
डॉ. पवन ओझा, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आणि डायरेक्टर – न्यूरोसायन्सेस, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, म्हणाले, “TMS ही शस्त्रक्रियाविरहित मेंदू उत्तेजनाची महत्त्वाची उपचारपद्धती असून काही मानसिक आजारांमध्ये तिचा प्रभावी वापर केला जातो. तसेच काही न्यूरोलॉजिकल आजारांमध्येही तिचा वापर आणि त्यावरील संशोधन सुरू आहे. मेंदूच्या विशिष्ट भागांना लक्ष्य करण्याची क्षमता ही TMS ची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. स्ट्रोकनंतरच्या पुनर्वसनामध्ये योग्य रुग्णांमध्ये मोटर फंक्शन तसेच बोलणे आणि भाषा कौशल्यांच्या पुनर्वसनाला मदत करण्यासाठी TMS चा वापर केला जाऊ शकतो. मात्र, TMS हा पारंपरिक वैद्यकीय उपचार किंवा पुनर्वसनाचा पर्याय नाही. रुग्णाची स्थिती, वैद्यकीय तपासणी आणि उपलब्ध वैज्ञानिक पुरावे यांच्या आधारे उपचारपद्धती निश्चित केली जाते.”
डॉ. सुरंजना बसाक, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, म्हणाल्या, “न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये पुनर्वसनासाठी सातत्यपूर्ण आणि विशेष उपचारांची आवश्यकता असते. स्ट्रोकनंतर निवडक रुग्णांमध्ये फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी तसेच स्पीच आणि लँग्वेज थेरपीसोबत TMS चा वापर केला जाऊ शकतो. पार्किन्सन्स आजार, न्यूरोपॅथिक वेदना, टिनिटस आणि इतर काही न्यूरोलॉजिकल समस्यांमध्येही TMS च्या संभाव्य उपयोगावर संशोधन सुरू आहे. प्रत्येक रुग्णाचा उपचाराला मिळणारा प्रतिसाद वेगळा असू शकतो. त्यामुळे उपचारापूर्वी योग्य मूल्यांकन आणि उपचारादरम्यान नियमित निरीक्षण महत्त्वाचे आहे.”
मानसिक आजारांच्या बाबतीत, पारंपरिक उपचारांमधून अपेक्षित सुधारणा न झालेल्या काही रुग्णांसाठी TMS हा अतिरिक्त उपचार पर्याय ठरू शकतो. सामान्यतः TMS उपचार अनेक सत्रांमध्ये दिले जातात. सूत्रांची संख्या आणि वारंवारता रुग्णाची समस्या आणि निवडलेल्या उपचार प्रोटोकॉल नुसार ठरवली जाते.
TMS उपचारादरम्यान रुग्ण शुद्धीवर असतो आणि सामान्यतः उपचाराचे एक सत्र पूर्ण झाल्यानंतर दैनंदिन कामकाजाकडे परतता येते. मात्र, उपचाराची पद्धत प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक स्वरूपाची असते.
TMS सर्व रुग्णांसाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे सविस्तर वैद्यकीय तपासणी, योग्य रुग्णाची निवड आणि उपचारानंतर नियमित फॉलो-अप यांना महत्त्व दिले जाते. TMS सोबत आवश्यकतेनुसार औषधे, मानसोपचार आणि पुनर्वसन उपचारांचा समन्वय केला जाऊ शकतो.
श्री. नीरज लाल, महाराष्ट्र आणि कर्नाटक विभागाचे रिजनल डायरेक्टर, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, म्हणाले, “नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील रुग्णांना अत्याधुनिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या आधारलेल्या मेंदूविषयक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा महत्त्वाचा भाग आहे. विशेष TMS लॅबच्या माध्यमातून मानसिक आणि न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये अतिरिक्त उपचार पर्याय उपलब्ध होत आहेत. प्रत्येक उपचार हा रुग्णाच्या वैद्यकीय तपासणीवर आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित असावा, याला आमचे प्राधान्य आहे. वैयक्तिक उपचार, अनुभवी तज्ज्ञ आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांचे उपचार परिणाम आणि जीवनमान सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
श्री. संदीप जोशी, सेंटर हेड, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई, म्हणाले, “रुग्णांच्या बदलत्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये विशेष उपचार सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्याने विस्तार केला जात आहे. TMS लॅब ही आमच्या न्यूरोसायन्स आणि न्यूरोसायकियाट्रिक सेवांमधील महत्त्वाची भर आहे. या सुविधेमुळे उपचार आणि पुनर्वसनाची संबंधित सेवा एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. TMS प्रत्येक रुग्णासाठी योग्य असेलच असे नाही; मात्र योग्य रुग्णांची निवड आणि वैयक्तिक उपचार प्रोटोकॉलच्या माध्यमातून ही उपचारपद्धती काही रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते. या सुविधेच्या माध्यमातून रुग्णांना लक्षणे नियंत्रित करण्यासोबतच त्यांच्या दैनंदिन कार्यक्षमतेत आणि जीवनमानात सुधारणा करण्यासाठी मदत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”