पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल
पनवेल दि.०४ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज आज पनवेल महानगरपालिका येथे निवडणूक अधिकारी नानासाहेब कामठे यांच्याकडे दाखल केला. 
यावेळी  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बाळासाहेब माने, उपनेते बबनदादा पाटील, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण, गटनेता लीना गरड, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, नगरसेवक उत्तम मोर्बेकर, प्रगती पाटील, कैलास पाटील, शहरप्रमुख प्रवीण जाधव, ऍड समाधान काशीद, मा तालुकाप्रमुख रामदास पाटील यांच्यासह इतर शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना उपनेते बाळासाहेब माने यांनी सांगितले कि, आमचे जुने शिवसैनिक दिव्यांग बांधव नितीन गावंड यांना उमेदवारी देऊन ते त्यांच्या पदाचा उपयोग पनवेल परिसरातील दिव्यांग बांधवांना महापालिकेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी काम करतील असा विश्वास व्यक्त केला. तर उपनेते बबनदादा पाटील यांनी सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून लादण्यात आलेला मालमत्ता कर विरोधात आमचे सर्व नगरसेवक सक्षम विरोधक म्हणून काम करतील असे नमूद केले. 
 


फोटो : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image