माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांशी साधला सुसंवाद...
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांशी साधला सुसंवाद
पनवेल(प्रतिनिधी)
पनवेल महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप नगरसेवक-नगरसेविकांशी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 18) सुसंवाद साधला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भाजप महायुतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये एकूण 78पैकी भाजपच्या 55 जागांसह महायुतीने 59 जागी विजय मिळवला. या विजयात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यांनी स्वतः निवडणूक न लढण्याची घोषणा आधीच केली होती. कार्यकर्त्यांनी आग्रह करूनदेखील त्यांनी नम्रपणे नकार दिला, पण प्रचारात झोकून देत भाजप महायुतीच्या विजयासाठी सक्रिय योगदान दिले. रॅलीत सहभागी होऊन त्यांनी मतदारांच्या घरोघरी जात गाठीभेटी घेतल्या आणि महायुतीच्या विजयाचे आवाहन केले. सुज्ञ मतदारांनीही विकासालाच आपला कौल दिला. 
पनवेल महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत जुन्या-जाणत्या नगरसेवकांसोबतच काही नवीन चेहरे निवडून आले आहेत. त्यांच्याशी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी कामोठे येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय व भाजप मध्यवर्ती कार्यालयात संवाद साधला. या वेळी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेषतः नव्या नगरसेवक-नगरसेविकांना त्यांनी आगामी कारर्किदीसाठी सकारात्मक संदेश दिला. याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले.
Comments