स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशांत ठाकूर यांना थेट फोन....
पनवेल / प्रतिनिधी : -
शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि पक्षाचे पनवेल मधील तरुण सुशिक्षित नेतृत्व ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रथमेश सोमण यांनी आज शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला. पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्वतः आमदार प्रशांत ठाकूर यांना फोन करून प्रथमेश सोमण यांच्या नावाची सूचना केल्यावर इतर उलट सुलट चर्चांनाही पूर्णविराम लागला. आपल्या कार्यकर्त्याला दिलेला शब्द पूर्ण करत पनवेलकरांना एक उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी दिल्याने कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे व खासदार बारणे यांचे आभार मानले. प्रभाग १८ मध्ये त्यांनी हक्काची दावेदारी सोडल्यापासून महायुतीचे समन्वयक म्हणून महापालिका निवडणुकीत जबाबदारी पार पाडली. याशिवाय वर्षानुवर्षे शिवसेना पक्षात विविध पदे भूषवून तथा माजी नगरसेवक म्हणून काम केलेल्या व प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या प्रथमेश सोमण यांच्या नावाचीच चर्चा पहिल्या दिवसापासून होती. निवडणुकीच्या प्राथमिक जागा वाटपाच्या चर्चेतच त्यांच्या नावावर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शिक्कामोर्तब केले होते. ड्युअल टॅक्स, मालमत्ता कर, डायलिसिस सेंटर, आरक्षित जातींच्या स्कॉलरशिप चा प्रश्न, हॉकर्स लायसन्स, राम मंदिर उद्घाटनाच्या वेळेस उद्भवलेला हिंदू मुस्लिम हिंसेचा प्रश्न, प्रदूषणाच्या प्रश्न पनवेल रेल्वे स्थानकातील रिक्षा युनियनची बांधणी, कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न, धर्मवीर चित्रपटाचे भव्य प्रीमियर्स, कोविड काळात गणपती विसर्जनाची राबवलेली अभिनव पद्धत, यासह लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे कोर कमिटीचे सदस्य आणि जबाबदार पदाधिकारी म्हणून महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. गरीब विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन चा अभिनव उपक्रम सोमण यांनी राबवला असता या संकल्पनेवर खुश होऊन स्वतः एकनाथ शिंदे यांनीच वैयक्तिक दहा लाख रुपयांची मदत सोमण यांना या योजनेसाठी दिली, तर धर्मवीर चित्रपटाच्या प्रीमियर वेळेसही प्रत्यक्ष न येता ही एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून सोमण यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. महापालिका , पोलीस, महसूल अशा प्रशासकीय खात्यांमध्येही प्रथमेश सोमण यांची असलेली सामाजिक पकड व स्वच्छ प्रतिमा ही जमेची बाजू आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून तथा अनेक पक्षप्रवेश करत पक्ष संघटना मजबूत केलेल्या प्रथमेश सोमण यांच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ पडणार असून त्याबद्दल संघटनेतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा देत आनंद व्यक्त केला आहे. ''सभागृहात शिवसेनेकडून एक अभ्यासू आणि प्रश्नांची जाण असलेला शिवसैनिक म्हणून प्रथमेशचेच नाव योग्य असल्याचा संघटनेतील प्रत्येक पदाधिकाऱ्याचा दावा आहे'' असे मत उपजिल्हाप्रमुख परेश पाटील यांनी व्यक्त केले. पूर्वीपासूनच निश्चित असलेली ही नियुक्ती अधिकृत करण्यासाठी महायुतीचे नेते तथा खासदार श्रीरंग आप्पा बारणे व पक्ष सचिव संजय मोरे यांनी देखील शिफारस पत्रे ही दिली आहेत. तर मंत्री उदय सामंत व भरत गोगावले यांनीही सोमण यांचेच नाव दूरध्वनीवरून भाजपच्या नेत्यांना यापूर्वी सुचवले होते. येत्या सहा तारखेला पालिकेच्या महासभेत याबाबत अधिकृत घोषणा होईल. मुख्य नेते एकनाथ शिंदे, राजकारणाचे बाळकडू पाजणारे शिवसेना स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, संजय मोरे, आमदार प्रशांत दादा ठाकूर यांसह एक दिलाने सोबत उभे राहणाऱ्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे सोमण यांनी आभार मानले. नामनिर्देशन अर्ज दाखल करताना आज प्रथमेश सोमण यांच्याबरोबर महापौर तथा गटनेते नितीन भाई पाटील, नगरसेवक प्रकाश बिनेदार जेष्ठ शिवसैनिक रमेश गुडेकर, उपनेते शिल्पाताई देशमुख, संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, विधानसभाप्रमुख नितीन काळे, महानगर संघटक मंगेश रानवडे, उपतालुकाप्रमुख जगदीश ठाकुर, तालुका संघटक नरेश नरसिंगे, महिला तालुका प्रमुख मंदाताइ जंगले, उपमहानगरप्रमुख इम्तियाज शेख , सचिन मोरे, महेश सावंत, उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, तळोजे शहरप्रमुख विशाल पवार, शहर समन्वयक राहुल कदम, तळोजे एमआयडीसी प्रमुख प्रकाश म्हात्रे, कामोठे शिवसेनेचे राकेश गोवारी, पनवेल शहर संघटिका प्रीती खानविलकर, नवीन पनवेल शहर संघटिका माया देवडे, कळंबोली शहर संघटिका ज्योतीताई पाटील, स्मिता भोईर, अर्चना जाधव, पनवेल शहर संघटक अभिजीत साखरे, खंडेश धनावडे, सिद्धेश खानविलकर, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, शैलेश जगनाडे, विभागप्रमुख आशिष पनवेलकर, प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान, मंदार काणे, शाखाप्रमुख किरण कळवेकर, किरण पवार व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image