पनवेल महापालिका मुख्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन उत्साहात संपन्न...
पनवेल महापालिका मुख्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन उत्साहात संपन्न...
पनवेल / प्रतिनिधी दि.२६ :- पनवेल महानगरपालिकेच्यावतीने ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे मैदानावर आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या शुभहस्ते  ध्वजवंदन करण्यात आले. 

या कार्यक्रमास महापालिका नवनिर्वाचित सदस्य अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, सहायक नगररचना केशव शिंदे, उपायुक्त  डॉ.वैभव विधाते, उपायुक्त मंगला माळवे, सहायक आयुक्त डॉ.रुपाली माने, सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, शिक्षणाधिकारी  रमेश चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भगवान गीते, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, विविध पक्षाचे पदाधिकारी,महापालिकेचे अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख, नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या वेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली. तसेच चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली.
Comments