आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिवसेनेच्या मोफत बस सेवेचा शुभारंभ...
कोकणातील गणेश भक्तांसाठी मोफत बससेवेच्या उपक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर व महापौर नितीन पाटील यांच्याकडून कौतुक

शिवसेना पनवेल महानगरप्रमुख, नगरसेवक ऍड. प्रथमेश सोमण आणि उपमहानगर समनव्ययक राहुल गोगटे यांचा पुढाकार
पनवेल / प्रतिनिधी 
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बस सेवेचा शुभारंभ शनिवारी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवसेना पनवेल महानगरप्रमुख तथा नगरसेवक ऍड. प्रथमेश सोमण आणि उपमहानगर समनव्ययक राहुल गोगटे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. महानगरप्रमुख, नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्यावतीने तीन मोफत वाहन सेवेचा शुभारंभ तर शिवसेनेचे महानगर संघटक राहुल गोगटे यांच्यावतीने आणखी एका मोफत वाहन सेवेचाही शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, महानगर प्रमुख, नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमण, महिला आघाडी तालुकाप्रमुख मंदाताई जंगले, उपमहानगरप्रमुख महेश सावंत, सचिन मोरे, युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, महानगर संघटक मंगेश रानवडे, एकनाथ म्हात्रे, राकेश गोवारी, शहरप्रमुख प्रसाद सोनवणे, शहर संघटक अभिजीत साखरे, विभागप्रमुख आशिष पनवेलकर , उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, सुजन मुसलोंडकर, युवासेना विधानसभा अध्यक्ष जय कुष्टे, अर्जुन परदेशी, अभिनय सोमण, धीरज निंबाळकर, सिद्धेश पवार, कौस्तुभ सोमण, मंदार काणे, खंडेश धनावडे, तोफीक बागवान आदी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर नितीन पाटील यांनी शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण व पत्रकार संजय कदम यांचा १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सव काळात कोकणवासीयांना दिलासा देणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments