तळोजा येथील 'द एलिट पब्लिक स्कूल' मधील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश
पनवेल / प्रतिनिधी : -
द एलिट पब्लिक स्कूल (C.B.S.E.), तळोजा या शाळेतील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश
कु.संस्कार सोमनाथ सूर्यवंशी (इयत्ता १० वी) या विद्यार्थ्याने शाळेमार्फत 'C.B.S.E. अंडर १७' च्या बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला असून, त्याची C.B.S.E. बोर्डातर्फे 'नॅशनल बॉक्सिंग स्पर्धे'साठी निवड झाली आहे.
त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या अर्थप्रिया मॅडम व क्रीडा शिक्षक नंदकुमार हे उपस्थित होते, त्यांनीही संस्कारचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.