प्रभाग १४ मध्ये आयुष्मान, आभा कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..
प्रभाग १४ मध्ये आयुष्मान, आभा कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरसेविका कु.आर्या प्रविण जाधव यांचा पुढाकार ; प्रभागातील नगरसेवकांची उपस्थिती...

पनवेल, दि.३० (वार्ताहर) : शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सहज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महाविकास आघाडीच्या नगरसेविका नगरसेविका कु.आर्या प्रविण जाधव यांच्या वतीने आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरादरम्यान नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचे कार्ड तसेच आभा कार्ड तयार करून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. परिसरातील पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.
या शिबिराला प्रभाग क्रमांक १४ मधील सर्व नगरसेवकांनी उपस्थिती लावत उपक्रमाला पाठिंबा दिला. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमाच्या आयोजनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रविण जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.



फोटो : आयुष्यमान, आभा कार्ड
Comments