४८ तासात अपहार झालेले ६६ तोळे सोने व आरोपी सोलापूर मधून ताब्यात ; पनवेल पोलिसांची कामगीरी ...
४८ तासात अपहार झालेले ६६ तोळे सोने व आरोपी सोलापूर मधून ताब्यात ; पनवेल पोलिसांची कामगीरी 

पनवेल / प्रतिनिधी  : -
दि. २०/०८/२०२५ रोजी पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्स शॉप मधील कामगार शुभम मनाजी खिलारे यास फिर्यादी यांनी सोन्याची शुध्दता तपासण्याकरीता दिलेले एकुण ६६,६२,३०० / - रूपये किमतीची ६६६.२३ ग्रॅम वजनाची ०६ सोन्याची लगड याचा आरोपीने अपहार केल्याने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे दि २१/०८/२०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ ( ४ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी पोलीस पथके तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवून आरोपीचा शोध घेण्याकरीता रवाना केले, पोलीस पथकाने पनवेल शहर व रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून तसेच तांत्रिक तपास करून आरोपीचा माग काढला असता आरोपी हा कुर्डुवाडी , सोलापुर येथे ट्रेन मधुन उतरल्याचे दिसुन आले . 
पोलीस पथकाने आरोपीचा माग काढत त्याचे मुळ गाव खिलारवाडी ,ता .सांगोला ,जि .सोलापुर येथे जावुन आरोपीचा शोध घेवून ,आरोपी शुभम मनाजी खिलारे यास ताब्यात घेवुन त्याने अपहार केलेला माल ६६६.२३ ग्रॅम वजनाची ०६ सोन्याची लगड हस्तगत करण्यात केला आहे . 

सदरची कार्यवाही मा .पोलीस उप आयुक्त श्रीमती रश्मी नांदेडकर , परिमंडळ ०३ , पनवेल , मा . सहा . पोलीस आयुक्त मधुर भुजबळ , पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) शकिर पटेल , पोलीस निरीक्षक ( प्रशासन ) अभिजीत अभंग , पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि / अभिजीत पाटील , पोउपनि / हजरत पठाण , पोउपनि / किरण राऊत , पोहवा / १३७८ अविनाश गंथडे , पोहवा / ११२३ योगेश दिवेकर , पोहवा / २२२८ अमोल पाटील , पोहवा / २३२६ संदेश म्हात्रे , पोना / ३२ ९ ५ मिथुन भोसले , पोशि / ४०३३ किरण कराड , पोना / ३०५४ सोमनाथ म्हात्रे , पोशि / ३०७० शशिकांत काकड यांनी केली आहे .
Comments