दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादीना केला परत..
पनवेल /प्रतिनिधी - :
पनवेल विभागाकडील पोलीस ठाण्यामध्ये जप्त असणारा दोन कोटींचा मुद्देमाल फिर्यादी आणि साक्षीदार यांना 12 सप्टेंबर रोजी पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे बाळा कुंभार, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे गजानन घाडगे यांच्या हस्ते परत करण्यात आला.
पनवेल शहर पोलीस ठाणे, पनवेल तालुका पोलीस ठाणे आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याकडील विविध गुन्ह्यांमध्ये विविध स्वरूपाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
यावेळी एकूण 17 गुन्ह्यातील, 143 मिसिंगमधील 107 तोळे सोने, सात वाहने, 143 मोबाईल फोन, असा एकूण दोन कोटी सात लाख 57 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यात आला.
यावेळी नागरिकांनी आपला मुद्देमाल परत मिळाल्याने पोलिसांचे आभार मानले.