माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल शहर शाखेत मानवंदना
पनवेल, दि.६ (वार्ताहर) : माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल शहर शाखेच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी माँसाहेबांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करत त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.
यावेळी विभागप्रमुख प्रविण जाधव, शहर संघटिका उज्वला गावडे, प्रभागप्रमुख प्रशांत नरसाळे, ग्राहक कक्षाचे कुणाल कुरघोडे, शाखाप्रमुख संतोष तळेकर, मयुरेश पाटील, विभाग संघटिका अश्विनी देसाई, अरुण ठाकूर, राम मंजुळे आणि अतुल टेमघरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माँसाहेबांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. भावपूर्ण वातावरणात माँसाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
फोटो : अभिवादन