पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यानात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा संपन्न...
पनवेल / प्रतिनिधी, दि.२६: पनवेलमधील हुतात्मा स्मारक येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिक कै. शांताराम अच्युत वालावलकर यांचे उत्तराधिकारी श्याम शांताराम वालावलकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी महानगरपालिकेचे आमदार प्रशांत ठाकूर, विधानपरिषदेचे आमदार विक्रांत पाटील, आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार मीना भांबरे, महापालिका सदस्य, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, नायब तहसीलदार जितेंद्र इंगळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त मंगला माळवे, सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर, सहायक आयुक्त डॉ.रुपाली माने, लेखा परीक्षक निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी व स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी, तसेच पनवेलकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार विक्रांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र सुरक्षा बल व रायगड सुरक्षा रक्षक मंडळाने ध्वजाला मानवंदना दिली.