महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान 

महिलांकरिता केली विशेष हेल्थ चेक-अप पॅकेजची घोषणा
 नवी मुंबई / पनवेल वैभव  -  :आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वाशी येथील न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आरोग्यसेवा, पोलीस, शिक्षण, प्रसार माध्यम आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून  मुंबई हायकोर्टाच्या वकील तसेच मराठवाड्यातील पहिल्या महिला वकील श्रीमती जयश्री अकोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 नवी मुंबईच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती माधुरी पाटे, डॉन बॉस्को माध्यमिक विद्यालय, नेरुळ येथील वरिष्ठ शिक्षिका श्रीमती ब्लॉसम वराला; फ्री प्रेस जर्नलच्या प्रेस रिपोर्टर सुश्री रैना असैनार; विशेष शिक्षिका व समुपदेशक आणि लाईफ कोच श्रीमती पूजा ठक्कूर; बालरोग रक्तविज्ञान(हेमॅटोलॅाजि), ऑन्कोलॉजी आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण सल्लागार डॉ. पूर्वी कुट्टी; बालरोगतज्ज्ञ डॉ. शतदीपा गोस्वामी; क्लिनिकल न्यूरोफिजियोलॉजिस्ट डॉ. अमरेथा नांबियार; ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ. कोपल विज आणि पिरियडोंटिस्ट आणि इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. शेहराजाद खुश्रु रँडेलिया या मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणावर आणि समाजातील त्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकेवर भाष्य करणारी प्रेरणादायी भाषणे झाली. यासोबतच केक कटिंग समारंभ, नृत्य-गायनाचे सादरीकरण आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी बोलताना न्यूईरा हॉस्पिटलच्या कन्सल्टंट पीडियाट्रिक हिमॅटोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. पूर्वी कुट्टी म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या ताकदीचा, समर्पणाचा आणि संवेदनशीलतेचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आरोग्य क्षेत्रात महिला डॉक्टर, नर्स आणि केअरगिव्हर म्हणून रुग्णांच्या सेवेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा उपक्रमांमुळे पुढील पिढीतील मुलींना आत्मविश्वासाने आपली स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते.

 न्यूईरा हॉस्पिटलचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माताप्रसाद गुप्ता म्हणाले, न्यूईरा हॉस्पिटलमध्ये आम्ही महिलांचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित ठेवत नाही. समाज आणि आरोग्यसेवेत महिलांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि समानता व सन्मानाची भावना वाढवणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाद्वारे न्यूईरा हॉस्पिटलने विविध क्षेत्रांतील महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना प्रोत्साहन दिले.

याच पार्श्वभूमीवर हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष ‘वुमेन्स हेल्थ चेक-अप पॅकेज’ ही जाहीर करण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये अल्ट्रासाऊंड अ‍ॅब्डॉमेन व पेल्विस, थायरॉईड पॅनेल (T3, T4, TSH), व्हिटॅमिन B12, युरीन रूटीन, आरबीएस, हिमोग्लोबिन, पॅप स्मिअर यांसारख्या महत्त्वाच्या तपासण्यांसह जनरल फिजिशियन आणि स्त्रीरोग तज्ज्ञांचे सल्लामसलत समाविष्ट आहे. महिलांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले.
Comments