शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड 

पनवेल दि. १० (वार्ताहर) : 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत बुधाजी पाटील यांची सहाव्यांदा रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.  
रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेल संघटनेच्या  २०२५-२०३० या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे. पनवेल तालुक्यातील दुकानदारांची संघटनेत सर्व पक्षाचे काम करणारे दुकानदार, पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत, सर्व पक्षाचे दुकानदार,पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या संघटनेची एकत्रित स्थापना झाल्यापासून भरत पाटील हे सतत ३० वर्षे संघटनेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत, त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक कार्यात योगदान आहे.
मा सहाय्यक धर्मादाय आयुक्त, रायगड विभाग, रायगड अलिबाग याच्या कार्यालयात नोंदणी करण्यात आलेली असून सन २०२५ ते २०३० पर्यंत खालील सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे. 
अध्यक्ष  भरत बुधाजी पाटील, उपाध्यक्ष शशिकांत शनिवार शेळके, सेक्रेटरी भालचंद्र गणपत पगडे, सह सेक्रेटरी केसरीनाथ विनायक पाटील, खजिनदार नंदकुमार दामोदर पाटील, सदस्य अनिल उर्फ बाबू लक्ष्मण जाधव, कृष्णा महादेव भेंडे, राकेश नंदकुमार ठाकरे, गुरुनाथ भाऊ गडगे, विनायक गुरुनाथ जगे, मधुकर बाबू गरुड, सुरेखा बळीराम थोरवे, मनिषा नामदेव गावाचे, मनिषा रवींद्र घरत, अदिती अरूण म्हात्रे, स्वप्नाली उमेश परदेशी, अनिता मोहन खुटळे, तानाजी लक्ष्मण पाटील, प्रदीप शंकर माळी, रविंद्र नारायण देसाई, श्याम नागू ठोंबरे, जगन्नाथ हिराजी शिवकर, अजहर अब्दुल गणी पटेल, बाळाराम परशुराम पाटील, वर्षा बाळकृष्ण म्हात्रे, समीक्षा सचिन पाटील, संगीता कोळी या सर्व सदस्यांची सन २०२५ ते सन २०३० कालावधी करीता बिनविरोध (एकमताने) निवड करण्यात आलेली आहे.


फोटो :  भरत पाटील यांची निवड
Comments