विचुंबे येथे दुर्गा माता महिला मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ विचुंबे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी भाजप महायुतीच्या पालीदेवद जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार प्राची अमित जाधव आणि विचुंबे पंचायत समिती गणाच्या उमेदवार नीलम प्रमोद भिंगारकर या दोन भगिनी सज्ज असल्याचे आवर्जून नमूद केले.या मेळाव्यात महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सरपंच प्रमोद भिंगारकर, बळीराम पाटील, अविनाश गायकवाड, अनिल भोईर, अनंत गायकवाड, विवेक भोईर, चेतन सुरते, श्रावणी भोईर, आरती गायकवाड, विभूती सुरते, प्रगती गोंधळी, स्वाती पाटील, भाग्यश्री भोईर, हर्षदा भिंगारकर, निकिता म्हात्रे, अमित म्हात्रे, कविता भोईर, प्राजक्ता भोईर, प्रमिला म्हात्रे, ज्योती भोईर, सोनम म्हात्रे, प्रणाली पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.