मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी विश्वास पेटकर यांनी साधला संवाद ; आघाडीला मतदान करण्याचे आव्हान ...
पनवेल वैभव / दि. १३ (संजय कदम) : पनवेल महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने प्रभाग 9 मध्ये वळवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी संवाद साधत महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आव्हान केले.
पनवेल महानगरपालिका निवडणूकीत महाविकास आघाडी कडून प्रभाग 9 (ब) मध्ये विश्वास पेटकर यांच्या पत्नी भारती विश्वास पेटकर (निशाणी शिट्टी) उभे असून त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे (9 ड) निवडणुक लढवत असून त्यांची निशाणी शिट्टी आहे. प्रकाश म्हात्रे कामगार नेते असून कामगार वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. तसेच रिलायन्स SEZ साठी आंदोलन मध्ये सक्रिय सहभागी असून टेम्भोडे वळवली संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत. मुंबई ऊर्जा प्रकल्पाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्यात प्रकाश म्हात्रे यांचा महत्वाचा वाटा आहे. तसेच प्रभाग (9 अ) मधून मालती पिंगला (निशाणी शिट्टी), आणि नीलिमा पाटील (9क) निशाणी झाडू हे महाविकास आघाडी मधून निवडणूक लढवत आहेत. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांनी नागरिकांना मालमत्ता कर, पर्यावरण रक्षण, प्रदूषण, पाणी प्रश्न, रस्ते, गटारे, झोपडपट्टी निर्मूलन, आदिवासी बांधवांचे प्रश्न, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, स्केटिंग साठी ट्रॅक, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, समाजाचे प्रश्न, पायाभूत सुविधा, बेरोजगारीचा प्रश्न, खेळाचे मैदान, वाहतूक कोंडी असे अनेक प्रश्न प्रभागात आहेत. हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार करणार असल्याचे सांगून महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आव्हान केले.
फोटो : महाविकास आघाडी प्रभाग 9