पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने घेतली महापौर नितिन पाटील यांची भेट ...
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने घेतली महापौर नितिन पाटील यांची भेट 


पनवेल दि.२५ (वार्ताहर) : पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ने पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितिन पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. संघटनेचे अध्यक्ष डॉ.वैभव मोकल यांनी संघटनेविषयी व संघटना करत असलेल्या  विविध सामाजिक उपक्रमांविषयी माहिती दिली. या व्यतिरिक्त वैद्यकीय व्यवसायात येणाऱ्या शासकीय समस्यांविषयी अवगत केले. महापौरांनी त्याविषयी एक स्वतंत्र बैठक बोलवावी असे सुचवले.महापौरांनी उपस्थित सर्व डॉक्टरांचे आभार मानले व  संघटनेच्या उपक्रमांना शुभेच्छा व सहकार्याचे आश्वासन दिले. 

सदर भेटीत डॉ.आशिष गांधी, डॉ.लक्ष्मण आवटे, डॉ.मिलिंद जोशी, डॉ.टिपणीस, डॉ.बहाडकर, डॉ.भावेश ठक्कर, डॉ.राजेश गांधी, डॉ.पटेल, डॉ ओक, डॉ आशिष भगत, डॉ शेख, डॉ सोमवंशी, डॉ माळवी, डॉ वसंत पाटील, डॉ अमित दवे उपस्थित होते.



फोटो : पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने घेतली महापौर नितिन पाटील यांची भेट
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image