गोसेवा आयोगाच्या अध्यक्षांची पनवेल महानगरपालिका कार्यालयाला सदिच्छा भेट...
गोसेवा आयोगाच्या अध्यक्षांची पनवेल महानगरपालिका कार्यालयाला सदिच्छा भेट...


पनवेल / प्रतिनिधी  : -
महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे राज्यमंत्री, अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी श्री पांजरपोळ गोरक्षण संस्था पनवेल येथे आयोजित पशुसंवर्धन प्रशिक्षण व कृती सत्र शिबिराच्या कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी पनवेल महानगरपालिका कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी पनवेलचे महापौर नितीन जयराम पाटील आणि महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, नगरसेवक शशिकांत शेळके, उपायुक्त डॉ. वैभव विधाते तसेच इतर मान्यवर आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
Comments