रस्त्यावर कचरा टाकू नये म्हणून नगरसेवक राजू सोनी यांचा अनोखा प्रयोग...

पनवेल दि.28 (संजय कदम)- रहिवाशांसह दुकानदारांनी त्यांच्या घरातील तसेच दुकानातील साठणारा कचरा उघड्यावर रस्त्यावर फेकू नये व त्यांना शिस्त लावावी या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी स्वखर्चाने अशा परिसरात दोन फुलझाडांच्या चांगल्या कुंड्या ठेवून तसेच फलक लावून कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.
         शहरातील टपाल नाका, कानिफनाथ मंदिर  मुख्य रस्त्यावर येथील व्यापारी व आजुबाजुच्या परिसरातील नागरिक नेहमी कचरा टाकत असल्याने त्या परिसरात खुप घाण वास येत होता व येथील लाईटच्या ट्रान्स्फरमरखाली कचरा जाऊन येथे दर ८ ते १० दिवसांनी त्यातुन धूर निघायचा ही बाब नगरसेवक राजू सोनी यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांच्या निदर्शनास आली त्यांनी लगेच राजु सोनी यांना सांगुन त्यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेचे सफाई कामगार व घंटागाडी बोलवुन येथील परिसर स्वच्छ करून दिला व आजपासुन  येथे कचरा टाकण्यास बंद केले. त्यामुळे तेथे काही दिवसासांठी १ सफाई कामगार सुध्दा ठेवण्यात आला आहे. तसेच तेथे स्व खर्चाने २ कुंड्या ठेऊन  फलक लावून नागरिकांना कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशाचप्रकारे प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागात हा आगळावेगळा उपक्रम राबविल्यास पनवेलच्या स्वच्छतेत अजून भर पडणार आहे.
          
फोटोः पूर्वी साठलेला कचरा व नंतर करण्यात आलेली स्वच्छता, झाडे व फलक
Comments