मोदिजींच्या "मन की बात" ला करंजाडेत उत्स्फूर्त प्रतिसाद...
मोदिजींच्या "मन की बात" ला करंजाडेत उत्स्फूर्त प्रतिसाद...

रामेश्वर आंग्रे यांचे लोकनेते मा.खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, महेश बालदी, जेएम म्हात्रे यांनी केले कौतुक ...

पनवेल/प्रतिनिधी -- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा १२३ वा भाग २९ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. देशवासियांना संबोधित करताना ते म्हणाले की, यावेळी तुम्ही आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उर्जेने भरलेले आहात. तो १० वर्षांपूर्वी सुरू झाला आणि आज तो जगभर पसरला आहे. योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मार्गदर्शन केले व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. मा सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी करंजाडेत अकरा ठिकाणी थेट प्रेक्षपण ठेवले होते. याला चांगला प्रतिसाद लाभला. 

माजी नगराध्यक्ष भाजप नेते जे.एम. म्हात्रे, गजानन पाटील, मनखुष नाईक, नाथा भरवाड, अशोक विखारे, उमेश भोईर, मंगेश बोरकर केतन आंग्रे, ओमकार चौधरी यांच्यासह भाजप जेष्ठ नेते, युवा नेते, सदस्य, जेष्ठ नागरिक, रिक्षा चालक, शिरवी समाज यांच्यासह करंजाडेवासी उपस्थित होते.

माननीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून देशवासियांना उद्देशून “मन की बात” मधुन संवाद साधतात. या कार्यक्रमाचे कौतुक संपूर्ण जगभर होते आहे. तसेच 11 वर्षे राष्ट्र सेवेची, समर्पणाची, सुशासनाची मा. पंतप्रधान मोदिजींच्या मन की बात द्वारे थेट संवाद साधला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'च्या १२३ व्या भागात अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या दरम्यान त्यांनी देशाला दोन मोठ्या आनंदाच्या बातम्याही दिल्या. पहिली म्हणजे, भारत आता धोकादायक डोळ्यांच्या आजारापासून पूर्णपणे मुक्त झाला आहे. दुसरे म्हणजे, आता देशातील ६४% पेक्षा जास्त लोकसंख्येला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत आहे. यावेळी मोदी यांचे मन की बात एकण्यासाठी करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सोसायट्या, सामाजिक मंडळे आदी अकरा ठिकाणी टीव्ही स्क्रीनद्वारे थेट प्रेक्षपण आयोजित केले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष भाजप नेते जे.एम.म्हात्रे यांनी कार्यक्रमाला भेट देत, रामेश्वर आंग्रे यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी करंजाडे वासियांनी चांगला प्रतिसाद दाखविला. यावेळी गजानन पाटील, मनखुष नाईक, नाथा भरवाड, शिरवी समाज नागरिकांनी मनोगते व्यक्त केले.

रामेश्वर आंग्रे यांचे लोकनेते मा.खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, महेश बालदी, जेएमम्हात्रे यांनी कौतुक केले.

मा सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी मोदीजी यांच्या कार्यावर विश्वास ठेवत, भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशानंतरच पहिल्यादा जोरदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमातर्गत चांगल्या नियोजनाबद्दल रामेश्वर आंग्रे यांचे लोकनेते मा.खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, महेश बालदी, जेएम म्हात्रे, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी कौतुक केले.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image