साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ पनवेल रश्मी नांदेडकर
पनवेल, दि.20 (संजय कदम) ः साईनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार व त्यांच्या सहकार्याने आज साईनगर या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्र स्थापित करण्यात आले आहे. त्याचा फायदा परिसरातील नागरिकांना होणार आहे व या ठिकाणी पोलीस कार्यरत राहणार आहेत असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ पनवेलच्या रश्मी नांदेडकर यांनी या पोलीस मदत केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले.
सदर नवीन साईनगर पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पनवेल श्रीमती रश्मी नांदेडकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह स्थानिक नगरसेवक लतिफ शेख व इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि साई नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते. सदर पोलीस मदत केंद्र हे स्थानिक नगरसेवक लतिफ शेख यांच्या माध्यमातून उभारण्यात आले असून साईनगर हा परिसर नव्याने विस्तार होत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या पोलीस चौकीचा मोठा उपयोग होणार असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांनी यावेळी दिली.
फोटो ः पोलीस चौकी उद्घाटन