प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी


पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील प्रभाग क्रं.14 साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे महाविकास आघाडीच्या नगरसेविका कु.आर्या प्रवीण जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रं.14 साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात पेशंटला बसण्याची खुर्ची (बाकडे), पिण्याच्या पाण्याची सोय, वॉश रुम, आरोग्य केंद्र कंटेनरमध्ये बनविण्यात आले आहे. त्यामुळे अचानक शॉक लागतो तरी ते दुरुस्त करावे. तसेच आरोग्य केंद्राची जागा देखील कमी पडत आहे याकरिता अधिक एक कंटेनरची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगरसेविका आर्या जाधव यांनी केली असून यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव उपस्थित होते.


फोटो ः कु.आर्या जाधव मागणी
Comments
Popular posts
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची कमाई ...
Image
महिलेची हत्या करण्यामध्ये आरोपीसोबत सहभागी असलेल्या प्रेमिकेस गुन्ह्यातील गाडीसह घेतले ताब्यात...
Image
भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न..
Image
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजे येथे भव्य वृक्षारोपण अभियान ; शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Image
लिफ्टमध्ये अडकलेल्या ४ तरुण-तरुणींची अग्निशमन दलाकडून सुटका...
Image