कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार

पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज विशेष सत्कार करण्यात आला.
शिवसेनेचे  खांदा वसाहत विभागाचे शहर प्रमुख सदानंद शिर्के यांची कन्या कु. सायली सदानंद शिर्के हिने वकिलीचे शिक्षण पूर्ण करून ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल आज खांदा-पनवेल शाखेत तिचा सत्कार करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. यावेळी पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल समन्वयक शिवाजी पालांडे तसेच शाखेतील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु. ॲडव्होकेट सायली शिर्के हिचे या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशिर्वाद देण्यात आले.
फोटो ः सत्कार
Comments
Popular posts
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची कमाई ...
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image