गुन्हेगारांचे कर्दनकाळ भाऊसाहेब ढोले पनवेलच्या सहाय्यक पोलिस आयुक्तपदी..
गुन्हेगारांचे कर्दनकाळ भाऊसाहेब ढोले पनवेलच्या सहाय्यक पोलिस आयुक्तपदी

नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणाऱ्या डॅशिंग अधिकाऱ्याचे पत्रकारांनी केले स्वागत...


पनवेल/ प्रतिनिधी.
गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत तब्बल ५ कट्टर नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणारे भाऊसाहेब ढोले नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ २ अंतर्गत पनवेल विभाग 
सहाय्यक पोलिस आयुक्तपदी रुजू झाल्याबद्दल क्रियाशील प्रेस क्लबचे रायगड जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांनी सहकाऱ्यांसमवेत त्यांचा हृदय सत्कार करत पनवेल कार्यालयात स्वागत केले.
यावेळी त्यांच्यासमवेत प्रा.ऍड मोहन गायकवाड सर कार्याध्यक्ष राज भंडारी,सचिव साबीर शेख,कोषाध्यक्ष चंद्रकांत शिर्के,पत्रकार गणपत वारगडा, विशाल सावंत,अनिल राय,भूषण साळुंखे, असीम शेख, तसेच पत्रकार अनिल कुरघोडे, रवींद्र गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते. 
       पनवेल येथे रुजू होण्यापूर्वी भाऊसाहेब ढोले नवी मुंबई पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेचा कारभार पाहत होते.तिथे अत्यंत उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या नावावर नोंदवली गेली आहे.गडचिरोली येथील पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्यापासून त्यांची धडाकेबाज अधिकारी म्हणून तमाम महाराष्ट्राला ओळख झाली.या चकमकी सोबतच गडचिरोली येथील त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली.
         सत्कार केल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना सय्यद अकबर म्हणाले की आम्हाला ढोले साहेबांचे बद्दल आणि ढोले साहेबांना आम्हा पत्रकारांबद्दल विशेष सन्मान असण्याचे कारण म्हणजे त्यांचे पिताश्री ज्येष्ठ पत्रकार कैलास ढोले साहेब देखिल पत्रकार असून अहिल्यानगर जिल्ह्यात परखड पत्रकार म्हणून त्यांची ख्याती सुप्रसिद्ध आहे.पुण्यनगरी आणि पुढारी या आघाडीच्या वृत्तपत्रांचे आवृत्ती संपादन त्यांनी यशस्वीरित्या केले आहे.नवी मुंबई येथील आर्थिक गुन्हे शाखेत उत्तम कामगिरी बजावणाऱ्या भाऊसाहेब ढोले यांनी तत्पूर्वी पुणे येथे देखील कायदा व सुव्यवस्था आधारित राखण्याचे काम उत्कृष्ट रित्या करून दाखवले आहे.
       सय्यद अकबर पुढे म्हणाले की पनवेल झपाट्याने वाढत आहे.वाढत्या नागरिकीकरणामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती देखील सक्रिय होत असतात.
तसेच कोकण चे प्रवेश द्वार असणाऱ्या पनवेल मध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे एक मोठे आव्हान समजले जाते.मला ठाम विश्वास आहे की ढोले यांच्या येथे येण्याने हे आव्हान पोलिस खाते सहज पेलू शकेल.कट्टर नक्षलवादी यांच्यापासून ते अगदी आर्थिक गुन्हे करणारे अती चतुर अशा सर्वच गुन्हेगारी प्रवृत्तींना वचक बसवण्याचे कसब ढोले यांच्या अंगी आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ २ पनवेल विभाग मध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यात जराही दुमत नाही.
         क्रियाशील प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांनी सत्कार करून स्वागत केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
Comments
Popular posts
नवीन पनवेल येथील आगीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत – नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांची पाहणी...
Image
महापौरपदासाठी नितीन पाटील तर उपमहापौरसाठी प्रमिला पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल...
Image
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचा माणगाव, महाड आणि श्रीवर्धन मधील शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर ...
Image
पनवेल पिल्लई युनिव्हरसिटी मध्ये 'अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई' चित्रपटाची टीम विद्यार्थ्यांच्या भेटीला ...
Image
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल, श्रीवर्धन, माणगाव, महाड, तालुक्यात महायुतीचा जोरदार प्रचार...
Image