शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

शिवसेना पनवेल समन्वयक राहुल गोगटे यांचा पुढाकार

पनवेल / प्रतिनिधी : -
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल शहर शिवसेनेतर्फे पनवेल म.न.पा. दगडी शाळा क्रं २ येथे वृक्षारोपण तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत छत्री व वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्यांचे तर शिवसेना पनवेल समन्वयक राहुल गोगटे यांच्या माध्यमातून छत्रीचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे राहुल गोगटे यांनी केले होते.

यावेळी शिवसेना जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, नगरसेवक,महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, शहरप्रमुख प्रसाद सोनवणे,शहर संघटक अभिजित साखरे, उपशहर प्रमुख शैलेश जगनाडे, अर्जुन परदेशी, शहर उपसंघटक खंडेश धनावडे,शाखा प्रमुख गुलाब बागवान,विक्रम पाटणकर,जेष्ठ शिवसैनिक सुजन मुसलोंडकर,मंदार काणे, आयोजक शिवसेना समन्वयक राहुल गोगटे,तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुजित म्हात्रे,शिक्षक वैभव पाटील, वैशाली सावळे, अर्चना माने,स्वाती पाटील आदींचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी राहुल गोगटे यांच्या अयोजनाचे कौतुक केले तसेच गोगटे हे कुठल्याही पदाची, नावाची अपेक्षा न ठेवता दरवर्षी हा कार्यक्रम करत असतात, त्यामुळे निश्चितच गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ होतो, शिवसेनेच्या ८०% समाजकारण २०% राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपेक्षित कार्य या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर व शिक्षकवृंद यांनी देखील राहुल गोगटे यांच्या कामाचे कौतुक करून यापुढे देखील असेच सहकार्य शाळेस करण्याचे आवाहन केले.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image