पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...


पनवेल / प्रतिनिधी   - : व्हेटरन्स वेल्फेअर असोसिएशनच्या पुढाकाराने रीजनल सेंटर ECHS मुंबईचे संचालक कमोडोर वरुण सिंह (SC) व लेफ्टनंट कर्नल बेजू महोन यांच्यासमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत रायगड जिल्ह्यातील विविध माजी सैनिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन पनवेल येथे प्रस्तावित ECHS पॉलीक्लिनिकला लवकरात लवकर मंजुरी देण्याची विनंती केली. यावेळी भारतीय तटरक्षक दलाचे नाविक ब्युरोही पनवेल येथे यशस्वीपणे कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.
              बैठकीदरम्यान विविध संघटनांतर्फे संयुक्त निवेदन (Memorandum) तसेच सन २०१८ पासून आजपर्यंतची सर्व संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आली. रायगड जिल्ह्याच्या भौगोलिक, सामाजिक आणि माजी सैनिकांशी संबंधित गरजांची सविस्तर माहिती देत पनवेल ECHS पॉलीक्लिनिक स्थापनेसाठी तयार करण्यात आलेला रोडमॅप संचालक महोदयांना सुपूर्द करण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीस रायगड जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये पूर्व सैनिक कल्याण संघ,माजी सैनिक सेल, शिवसेना महाराष्ट्र, माजी सैनिक सेवा संघटना – कर्जत, खालापूर व सुधागड,शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, रायगड (अलिबाग),माजी सैनिक सामाजिक संस्था पेण,सैनिक फेडरेशन रायगड,माजी सैनिक सामाजिक संस्था, पनवेल,पूर्व सैनिक कल्याण संघटना, कामोठे, शासकीय व निमशासकीय माजी सैनिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
         सन २०१८ पासून पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापनेची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या प्रस्तावास ECHS (Integrated Headquarters) यांनी मान्यता देऊन तो संरक्षण मंत्रालयाकडे (MoD) पाठविण्यात आला आहे.
रायगड हा महाराष्ट्रातील विस्तीर्ण जिल्हा असून त्यामध्ये १५ तालुक्यांचा समावेश आहे. पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन झाल्यास सुमारे ५,७३४ माजी सैनिकांना थेट लाभ मिळणार आहे. तसेच त्यांच्या आश्रितांसह एकूण २२,२९३ लाभार्थ्यांना अधिक चांगल्या, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होती, तसेच पनवेल व नवी मुंबई परिसर आज देशातील एक महत्त्वाचे विकासकेंद्र म्हणून उदयास येत आहेत. रेल्वे, बस, रिक्षा तसेच खासगी वाहनांद्वारे या परिसरात सहज पोहोचता येते. निकट भविष्यात कर्जत–खोपोली–पनवेल लोकल रेल्वे सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय मुंबई ३.० प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू यांसारख्या विकासकामांमुळे पनवेलला नवी ओळख आणि उत्कृष्ट संपर्क व्यवस्था प्राप्त झाली आहे. तसेच यावेळी पॅनेल रुग्णालयांमध्ये दाखल होताना रुग्णांकडून अतिरिक्त रक्कम मागितली जाणे, आवश्यक औषधांची वेळेवर उपलब्धता,
रेफरल प्रकरणांमध्ये काही पॅनेल रुग्णालयांकडून वैद्यकीय चाचण्यांसाठी शुल्क आकारले जाण्याबाबतच्या तक्रारी
या प्रमुख बाबींचा समावेश होता. या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित माजी सैनिकांना  देण्यात आले.
या बैठकीस रायगड जिल्ह्यातील पेण, कर्जत, खोपोली, खालापूर, सुधागड, अलिबाग तसेच इतर भागांतील माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये श्री महेंद्र सिंह, श्री सरदार चोपडे, श्री पुरुषोत्तमजी, श्री विजय जगताप, श्री अजय प्रधान, श्री मुनेश्वर तसेच श्री दत्तात्रेय चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व संघटनांनी एकमुखाने पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिकची स्थापना ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यास तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image