छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील अतिक्रमणाविरोधात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)आक्रमक...
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील अतिक्रमणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक
पनवेल वैभव, दि.25 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तेथील सुरक्षा रक्षकांनीच अतिक्रमण केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संताप व्यक्त करून आज संतप्त शिवसैनिकांनी तेथे जावून ते अतिक्रमण हटविले आहे. यातूनच पनवेल महापालिकेचा भोंगळ कारभार दिसून येत आहे.
दोन दिवसापूर्वीच शहरातील महापुरुषाची विटंबना केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सुद्धा तेथील सुरक्षा रक्षकाचा हयगयीपणा समोर आला होता. असे असतानाच शहरातील टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असणार्‍या सुरक्षा रक्षकानेच त्या पुतळ्याजवळ चौथर्‍यावर खुर्च्या टाकून आडोसा करून तेथे बेकायदेशीर पंखे लावून पाय लांब करून आराम करत असत. ही बाब पनवेल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या लक्षात येताच त्यांच्यासह शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शहरप्रमुख कुणाल कुरघोडे, प्रदीप माखीचा, मयुरेश पाटील, साईसूरज पवार, अनिल खुटले, ठाकूर आदी शिवसैनिकांनी धाव घेवून याबाबत तेथील सुरक्षा रक्षकांना जाब विचारला व तेथील अतिक्रमण काढले. 
त्याचप्रमाणे तेथील ठेकेदाराला तात्काळ बोलावून घेवून 4 दिवसात या सुरक्षा रक्षकांसाठी वेगळी केबिन बाजूला उभारावी असा दमच दिला व यापुढे अशा प्रकारे महापुरुषांच्या पुतळ्याबाबत गलथान कारभार केल्यास तो शिवसेना कदापी सहन करणार नाही, असा सज्जड दमच शहरप्रमुख प्रवीण जाधव यांनी यावेळी पनवेल महापालिकेला दिला आहे.


फोटो ः छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अतिक्रमण
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image