रोटरी क्लब ऑफ पनवेल, शंकरा आय हॉस्पिटल व ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल शहर यांचे संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर संपन्न...
पनवेल वैभव / प्रतिनिधी :-
रोटरी क्लब ऑफ पनवेल, शंकरा आय हॉस्पिटल व ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल शहर यांचे संयुक्त विद्यमाने डोळे तपासणी शिबिर दि.२७/०६/२०२५ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल शहर येथे आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिरात ६६ सभासदानी आपले डोळे तपासणी करून घेतले.
रोटरी क्लब अध्यक्ष शैलेश पोटे, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ आवटे , शंकरा आय हॉस्पिटल चे संजीव जोशी, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष जयवंत गुर्जर, यांचे उपस्थितीत यशस्वी रीत्या हा उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम राबविण्यात उपाध्यक्ष माधुरी गोसावी, सचिव सुनिल खेडेकर, सह. सचिव भास्कर चव्हाण, खजिनदार विनोद बिंद्रा,संचालक नारायण देशपांडे, सूर्यकांत लांजेकर, सुरेश तुपे, दत्तात्रय ढोले, प्रकाश माणिक यांनी विशेष मेहनत घेतली.
समाजोपयोगी असेच कार्यक्रम या पुढे ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल येथे घेण्यात येतील असे डॉ. आवटे यांनी सुचित केले.
सचिव सुनिल खेडेकर यांनी रोटरी क्लब, शंकरा आय हॉस्पिटल व ज्येष्ठ नागरिक संघ संचालक यांचे आभार मानले.