श्री प्रल्हादराव झुलेलाल ट्रस्ट कडून रक्तदान शिबिराचे आयोजन...
श्री प्रल्हादराव झुलेलाल ट्रस्ट कडून रक्तदान शिबिराचे आयोजन...

पनवेल वैभव : -
श्री प्रल्हादराव झुलेलाल ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे , पुज्य सिंधी पंचायत, पनवेल रिक्षा विद्यार्थी वाहक संस्था , पनवेल तालुका पत्रकार विकास मंच पनवेल -नवी मुंबई पत्रकार संघ, विश्व सिंधी सेवा संगम आणि टाटा मेमोरियल सेंटर खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन पूज्य सिंधी पंचायत झुलेलाल मंदिर पनवेल येथे  कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीकरिताआयोजित करण्यात आले होते. 
यावेळी 72 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन  नियमित रक्तदाते श्री व सौ सचिन कापसे, सुप्रसिद्ध चित्रकार भूषण चोणकर यांच्या हस्ते झाले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता ॲड मनोहर सचदेव, ॲड अमोल साखरे, पांडुरंगजी हुमणे, किसन रौंदळ, मुरलीधर ढाके, ,संगीता साखरे, उज्वला व सचिन भिसे, प्रभाकर म्हात्रे, बन्सीलालजी तळेकर राजेशजी भगत व सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. 
Comments