अमर म्हात्रे विचारमंच व जीवदानी महिला उत्कर्ष मंडळाच्या नवरात्रोत्सवाला विविध मान्यवरांची भेट..
अमर म्हात्रे विचारमंच व जीवदानी महिला उत्कर्ष मंडळाच्या नवरात्रोत्सवाला विविध मान्यवरांची भेट.

मान्यवरांनी घेतले देवीचे दर्शन ;  नवरात्रोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरण.


उलवे / प्रतिनिधी :-
अमर म्हात्रे विचारमंच व जीवदानी महिला उत्कर्ष मंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाला विविध मान्यवरांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन भाऊ अहिर, जिल्हाप्रमुख विनोदजी साबळे आणि आशिष शेलार यांनी नवरात्रोत्सव मंडळाला भेट दिली. तसेच महाराष्ट्र ट्रिपल केसरी व भारत सरकार पदक विजेते पैलवान एसीपी विजय चौधरी यांनीही अमर म्हात्रे विचारमंच व जीवदानी महिला उत्कर्ष मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.मान्यवरांच्या भेटीमुळे मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक भक्तिभावासह सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन यावेळी घडले.
Comments