"मराठी भाषा गौरव दिनी" मराठी भाषा गौरव दिन समारंभ व कवी संमेलनाचे आयोजन...
"मराठी भाषा गौरव दिनी" मराठी भाषा गौरव दिन समारंभ व कवी संमेलनाचे आयोजन

के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि कोमसाप शाखा-पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने
पनवेल / प्रतिनिधी : -
के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, आणि कोमसाप शाखा-पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन, स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी, ज्ञानपीठकार कुसुमाग्रज जयंती निमित्त "मराठी भाषा गौरव दिनी" मराठी भाषा गौरव दिन समारंभ व  कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. 

सभेच्या अध्यक्ष वाचनालयाचे  उपाध्यक्ष बी.पी. म्हात्रेसर कोमसाप पनवेल अध्यक्ष कुडकेसर, सचिव विजय द.गायकर, खजिनदार काशिनाथ जाधव जयश्री शेटे मॅडम, रोहिदास पोटे सर उपस्थित होते. 
पोटे सर, जाधव, गायकर, म्हात्रे, कुडके यांनी मराठी भाषेचे महत्त्व कसे वाढेल व त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याची उदाहरणे देऊन आपली मनोगत व्यक्त केली. 
कुडके सरांनी आपल्या मनोगतात कुसुमाग्रज, व तात्याराव लहानें कार्याचे विस्तृत वर्णन केले. रोहिदास  पोटे सरांनी कुसुमाग्रज व  स्वातंत्र्यवीरांच्या  कवितासंग्रहाचे रसभरीत वर्णन केले. विजय गायकर यांनी आपण सर्व स्वातंत्र्य सैनिक, हुतात्म्यांनी परिश्रमपूर्वक, बलिदानाने हे राष्ट्र दिलेले आहे. आपण त्यांचे सदैव उतराई लागतो. धर्म, जात, पंथभेद न ठेवता त्यांच्या कार्याचा सन्मान आपण सदैव केला पाहिजे. काशिनाथ जाधवांनी कॉलेज जीवनात कुसुमाग्रजांच्या कवितांचा कसं गारुड होतं त्याबद्दल सांगितलं.म्हात्रे सरांनी हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून खूप सुंदररित्या अगदी थोडक्या वेळात साकारलात त्याबद्दल धन्यवाद दिले. मी आता पुस्तकांचेही परीक्षण करतो हे सांगितले.  

यावेळी राजकुमार ताकमोघे, प्रकाश पाटील, शिवाजी मोटे, नंदकुमार शिंदे, मीनल वसमतकर, करकरे मॅडम, विजय चव्हाण, नागनाथजी डोलारे, स्मिता गांधी, श्रद्धा तारे  यांनी आपल्या कविता सुंदररित्या सादर केल्या.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image