ममता प्रितम म्हात्रे बिनविरोध नगरसेवक म्हणून विजयी ...
ममता प्रितम म्हात्रे बिनविरोध नगरसेवक म्हणून विजयी 
पनवेल / प्रतिनिधी  - : भाजप नेते प्रितम म्हात्रे यांच्या पत्नी ममता प्रितम म्हात्रे या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ मधून बिनविरोध निवडून आल्या
आहेत. 

प्रतिस्पर्धी विरोधी पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने ममता प्रितम म्हात्रे या बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्ते नागरिकांनी जल्लोष केला.
       
भाजपा नेते प्रितम म्हात्रे यांचा दांडगा जनसंपर्क आहे. तसेच ते नेहमी इतरांच्या सुखदुःखात सामील होत असतात. विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी पनवेल परिसरातील अनेक विकास कामे मार्गी लावली. 2025- 26 च्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी ममता प्रितम म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सेजल खडकबाण यांनी 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ममता प्रितम म्हात्रे या बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे असंख्य मतदार, पक्षाचे कार्यकर्ते, भाजप नेते यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
Comments