दिव्यांग जनजागृती रॅलीमधील विद्यार्थ्यांना पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे खाऊचे वाटप
पनवेल वैभव / दि.०५(वार्ताहर): दिव्यांग जनजागृती रॅलीमधील विद्यार्थ्यांना पनवेल शहर वाहतूक शाखे तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.
नवीन पनवेल विभागामध्ये रोटरी क्लब आयोजित दिव्यांग जनजागृती रॅलीसाठी सहभागी मुला-मुलींना प्रोत्साहन म्हणून पनवेल शहर वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील साहेब यांच्या सहकार्याने आदई सर्कल नवीन पनवेल या ठिकाणी दिव्यांग रॅली आल्यानंतर 50 ते 60 दिव्यांग मुलांसाठी कॅडबरी व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. या उपक्रमामुळे दिव्यांग मुलांमध्ये उत्साह आपुलकीची भावना निर्माण झाला असून हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, पो हवा युवराज येळे, पो हवा अमीर मुलाणी, पो हवा सतीश चौधरी, पो हवा संजय पाटील, पो शि बालाजी थिटे उपस्थित होते.
फोटो: खाऊचे वाटप