उरण फाटा सर्व्हिस रोड आणि कळंबोली स्टील मार्केट येथील १० तृतीयपंथीयांवर गुन्हे शाखेची कारवाई
पनवेल दि.०४(संजय कदम): उरण फाटा सर्व्हिस रोड आणि कळंबोली स्टील मार्केट येथील १० तृतीयपंथीयांवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा सचिन गुंजाळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिसरात तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी कक्षाकडील अधिकारी व अंमलदार यांच्या दोन टिम तयार करून "नवी मुंबई आयुक्त परिसरातील उरण फाटा सर्व्हिस रोड व कंळबोली स्टील मार्केट रोड येथे तोकडे कपडे परिधान करून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना टाळया वाजवुन हातवारे, बिभत्स हावभाव व अश्लिल चाळे करत असताना मिळुन आल्या. त्यावरून उरण फाटा सर्व्हिस रोड येथुन ५ तृतीयपंथी तसेच कळंबोली स्टील मार्केट रोड येथुन ५ तृतीयपंथी ताब्यात घेवुन त्याच्या विरूध्द सीबीडी व कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले आहेत. सदरची कारवाई सहा. पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली वपोनिरी पृथ्वीराज घोरपडे, सपोनि राजश्री शिंदे, पोउपनिरी सरिता गुडे, पोशि ठाकुर, पोशि चव्हाण, पोशि पारासुर, मपोना अडकमोल, मपोना भोये, चालक पोहवा हांडे यांनी केली आहे.
फोटो: तृतीयपंथीयांवर कारवाई